मतपत्रिकेच्या पध्दतीकडे परत जाण्यात अर्थ नाही – मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली – सर्व पक्षांची मते आणि त्यांच्या समस्यांचा विचार करणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी म्हटले आहे. राजकीय पक्षांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आगामी लोकसभा त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात सर्व पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. नोंदणीकृत 7 राष्ट्रीय पक्ष आणि 51 प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

मतदार यादीची पारदर्शिता, राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावरील मर्यादा, आणि खर्चाचा ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची कालमर्यादा आदी विषयांवर या बैठकीत विचारविनिमय झाला. पोस्टल मते इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने देण्याबाबत, त्याचप्रमाणे विकलांग मतदारांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबतही राजकीय पक्षांची मते विचारण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बैठकीत काही पक्षांनी इव्हीएम आणि व्हीपीपीएटी बाबत शंका व्यक्त करून हरकत घेतली. त्यांच्या मागणीवर विचार करण्यात येईल, असे सांगून ओपी रावत यांनी सांगितले, की त्याच वेळी मतदान पत्रिका पद्धतीकडे परत जाण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे “बूथ कॅप्चरिंग’ चा धोका पुन्हा निर्माण्‌ होण्याची भीती असल्याचे मत अनेक पक्षांनी व्यक्त केले आहे.

आम्ही सर्व पक्षांचे विचार आणि समस्या ऐकल्या आहेत. सर्वावर सकारात्मक उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ओपी रावत यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)