मतदार राजाने उमेदवाराकडे पैशासाठी पसरविले हात! 

उमेदवाराची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार 

नगर  – निवडणूक म्हटले की, पैशाचा धूर… पैशाच्या वाटपावरून अफवांना पूर… या उमेदवाराने एवढे वाटले, तेवढे वाटले, असं बरच काही चर्चा होते. पैसे वाटपावरून उमेदवार एकमेकांना टार्गेट देखील करतात. मतदार मात्र निवडणुकीच्या काळात राजा बनतो. परंतु हाच मतदार राज्याने उमेदवारांसमोर पैशासाठी हात पसरले आहेत. त्याचा प्रत्यय या निवडणूक आला आहे. उमेदवार संदीप भांबरकर यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

-Ads-

महापालिका निवडणुकीसाठी नऊ डिसेंबरला मतदान होत आहे. यामुळे थंडीच्या वातावरणात देखील राजकीय धुरंदरांनी शहराचे वातावरण तापून ठेवले आहे. सर्वच पातळीवर प्रचाराचा उच्चांक होत आहे. राजकीय पक्षांनी आपआपल्या नेत्यांच्या सभांचे आयोजन केले आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार विविध क्‍लृप्त्या लढवित आहे. मतदान आपल्यालाच व्हावे यासाठी आमिष दाखवित आहेत. पार्ट्यांचे आयोजन होत आहे.

महापालिका व महसूल प्रशासन ही मतदान प्रक्रिया निर्भय आणि प्रलोभन मुक्त व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच मतदाराने उमेदवाराकडे पैसे मागण्याचा हट्ट धरण्याचा प्रकार महापालिका निवडणुकीत झाला आहे. उमेदवार संदीप भांबरकर यांनी केलेल्या तक्रारीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी अचंबित झाले आहेत.

उमेदवार संदीप भांबरकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून माझ्याकडे दोन मतदार आहेत, त्यासाठी किती पैसे देशील, अशी विचारणा केली आहे. भांबरकर यांनी या प्रकाराची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. आपण या प्रकाराविरोधात आहे. तरी देखील अशी मागणी होत असून, ते लोकशाहीला घातक आहे, असेही भांबरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. मतदारांनी या तक्रारीचे स्वागत केले आहे. प्रलोभनाला बळी पडणाऱ्या आणि लोकशाहीला घातक असलेल्या मतदारांविरोधात अशा तक्रारी झाल्याच पाहिजे, असेही नगरकरांचे म्हणणे आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)