सातारा – भारत निवडणूक आयोग यांच्याकडील मार्गदर्शक सुचनांनुसार पुणे महसूल विभागाकरिता विभागीय आयुक्त, पुणे डॉ. दिपक म्हैसेकर हे मतदार यादी निरीक्षक असून दि. 1 जानेवारी 2019 च्या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा पुर्नरिक्षण कार्यक्रम दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोबर 2018 अखेर राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. दिपक म्हैसेकर हे दि. 14 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्याच्या पहाणी दौरा करणार आहेत. या अनुषंगाने तहसील कार्यालय, सातारा येथील मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत चाललेल्या कामांची पाहणी करुन ते दुपारी 12.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील बैठक सभागृहामध्ये मतदार यादी पुनर्रिक्षणासाठी कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारी, गऱ्हाणी निवारणासाठी त्यांनी वेळ राखीव ठेवलेली असून त्यानंतर याच ठिकाणी दुपारी 12.30 वा. जिल्ह्यातील लोकसभा सदस्य तथा खासदार, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य तथा आमदार, विविध राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेणार आहेत.

तरी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)