मतदार यादीत नावासाठी साडेपाच हजार अर्ज

पुणे,दि.7- मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी, यादीतील नाव-पत्त्यांमधील दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये रविवारी एकूण 7 हजार 393 अर्ज आले आहेत. यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 5 हजार 396 नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत.

मतदार यादीतमध्ये अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी व्हावी, तसेच मतदार यादी अचूक व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्‍टोबरच्या प्रत्येक रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र स्तरावर ही मोहीम रविवारी राबविण्यात आली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित होते.

-Ads-

जिल्हा प्रशासनाकडे एकाच दिवशी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 5 हजार 396 अर्ज आले. यामध्ये 18-19 वयोगटातील 1 हजार 590 तरुणांनी अर्ज दिले आहेत. तर मतदार यादीत नाव, पत्त्यांमधील दुरुस्ती, मयत दुबार नावे वगळणे आदींसाठी 1 हजार 997 नागरिकांनी अर्ज केले आहे. दरम्यान ऑक्‍टोबरमधील दि.14, दि.21 आणि दि.28 या दिवशीही ही मोहीम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सुरू राहणार आहे.

मतदारसंघ – एकूण अर्ज
वडगावशेरी – 110
शिवाजीनगर – 190
कोथरुड – 311
खडकवासला – 988
पर्वती – 714
हडपसर – 302
पुणे कॅन्टोंन्मेट – 82
कसबा पेठ – 81

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)