मतदार यादीतील दुरुस्तीसाठी 20 हजार अर्ज

पुणे – मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी, मतदार यादीतील नाव व निवासी पत्त्यांमधील दुरुस्तीसाठी निवडणूक विभागाने ऑक्‍टोबरमध्ये प्रत्येक रविवारी विशेष मोहीम राबवली. त्यानुसार शेवटच्या (चौथ्या) रविवारी जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदार संघातून 20 हजार 631 अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाकडे पहिल्या रविवारी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 17 हजार 215 अर्ज नाव नोंदणीसाठी आली आहेत. त्यात 18 ते 19 वयोगटातील 5 हजार 384 नवमतदारांनी अर्ज केले. तर 19 वर्षांपुढील 17 हजार 715 नागरिकांनी अर्ज केले आहेत. तसेच मतदार यादीत नाव, पत्त्यांमधील दुरुस्ती, मयत दुबार नावे वगळणे आदींसाठी 1 हजार 674 नागरिकांनी अर्ज केले आहे. जिल्हा आणि शहरातील 6 हजार 478 मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आलेली अर्ज स्वीकारली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतदार यादीमध्ये अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी व्हावी तसेच मतदार यादी अचूक व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्‍टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र स्तरावर ही मोहीम रविवारी राबविण्यात आली. मोहिमेच्या तिसऱ्या रविवारी 9 हजार 936 तर चौथ्या रविवारी (दि.28) ही संख्या दुपटीने वाढली असून 20 हजार 631 अर्ज प्राप्त झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)