मतदार यादीतील इच्छुकांची नावे कमी करण्यासाठी बोगस अर्ज

मलकापूर रणांगण : पालिकेत ऑनलाईन बनावट अर्जाचे पेव

प्रत्यक्षपणे सांगणाराचेच नाव कमी होईल

बनावट अर्ज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईलच. जी व्यक्ती समारे येवून मतदार यादीतून नाव कमी करा, असे प्रत्यक्षपणे सांगेल त्याचेच नाव मतदार यादीमधून कमी केले जाणार असून इतरांची नावे कायम राहतील, अशी माहिती मंडलाधिकारी ज्योतिराम बोडके यांनी दिली.

कराड  – मतदार यादीत समाविष्ट असलेली सुमारे 563 नावे कमी करण्यासाठी ऑनलाईन बनावट अर्ज केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या निवडणूकीत इच्छुक असलेल्यांच्याच नावाला कात्री लावण्याचा प्रयत्न केल्याने मलकापूरच्या राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. सदरचे अर्ज कोणी केले हे स्पष्ट झालेले नसले तरी या ऑनलाईन चा सुत्रधार कोण? याची जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, याबाबत संबंधितांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन मतदार यादीत नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

-Ads-

मलकापूर नगरपालिका निवडणुकीमुळे पदाधिकाऱ्यांच्या धावपळी सुरु आहेत. या अनुषंगाने मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार नावे कमी करणे व नावे नव्याने समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र मतदार यादीतून नावे कमी करावीत, अशा स्वरुपाचे 563 अर्ज निवडणुक आयोगाला प्राप्त झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मेलवर हे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची खातरजमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. यातील अनेक लोकांनी नाव कमी करण्यासाठी अर्ज केलेले नसतानाही त्यांच्या नावाने कोणी तरी बनावट ऑनलाईन अर्ज केल्याची गंभीर बाब समोर आल्यामुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदरचे अर्ज कोणत्या ई-मेल आयडीवरुन करण्यात आले आहेत, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

 

मतदार यादीतून नावे कमी करण्यासाठी आमच्या नावांनी ज्या कोणी बनावट अर्ज केले आहेत. त्या संबंधितांची सखोल चौकशी होवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. याप्रकरणी आम्ही जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचेकडे तक्रार करणार असून सायबर क्राईमकडेही याची तक्रार दाखल केली आहे. पूर्ण चौकशी केल्याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांनी कोणाचेही नाव मतदार यादीतून कमी करु नये.
– राजेंद्र यादव, माजी नगरसेवक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)