मतदार यादीच्या हरकतींवर सुनावणी घ्या

संग्रहित छायाचित्र

पुणे – मतदार यादीवर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रकिया सुरू झाली असून येत्या 14 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्याच्या सूचना राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच अंतिम मतदार यादी 11 जानेवारी 2019 ला प्रसिद्ध केली जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेतली होती. तसेच मतदार यादीत नाव मतदारांची नोंद, दुबार, मयत आणि स्थलांतरितांची नावे वगळणे त्याचबरोबर नाव-पत्यांमधील दुरुस्ती आदी कामे या मोहिमेत करण्यात आली आहे. मतदार नाव नोंदणी मोहिमेत दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांची नावे नोंदविण्यात आली. या नावासंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे हरकती नोंदविण्यात आल्या असतील, तर त्यावर 14 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)