मतदार नोंदणीला वडगावात चांगला प्रतिसाद

वडगाव मावळ –  येथील मावळ पंचायत समिती चौकात सुरू असलेल्या भाजप व आरपीआय (गट) युतीच्या माध्यमातून चालू केलेल्या येथील मतदान नोंदणी केंद्रावर आमदार बाळा भेगडे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून या अभियानाची माहिती घेतली. तसेच नागरिकांचे नवीन मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेतले. तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे सभापती गुलाबराव म्हाळसकर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पात्र नवमतदारांची मतदार यादीत नोंद करण्यासाठी भाजपच्या वतीने विशेष मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. याला नव मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या नोंदणीसाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची या अभियानात माहिती दिली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)