मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

जागतिक युवा दिनानिमित्त महाविद्यालयीन स्तरावर निवडणुका होणार

नगर: नवव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त (ता. 25) जिल्ह्यात विविध उपक्रमशील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्राचार्य, प्रतिनिधी, जिल्हा स्वीप समितीचे सदस्य यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला 30 प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हयातील शाळा, महाविदयालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळाची कार्यालये, बॅंका, स्वयंसेवी संस्था येथे मतदार जागृतीबाबत विविध कार्यक्रम राबविणेबाबत सर्व स्वीप समिती सदस्यांना सूचना देणेत आल्या. सदर कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविदयालय स्तरावर निबंध, वक्‍तृत्व, वादविवाद, घोषवाक्‍य, चित्रकला, रांगोळी इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत उपस्थितांना निर्देश देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक युवा दिनानिमित्त (ता. 12) महाविद्यालयीन स्तरावर निवडणुका, लोकशाही बळकटीकरण, मतदान जागृती व अत्याधुनिक ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत जागृती इत्यादी विषयांवर वक्‍तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा यांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांची प्राथमिक फेरी बुधवार (ता. 9) जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या कामी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधून विद्यार्थी स्पर्धकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास कळवणेबाबत सूचना देणेत आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये नवमतदार, शतायुशी मतदार, दिव्यांग व तृतीयपंथीय मतदारांचा शंभर टक्‍के सहभाग व्हावा यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त (ता. 25) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर व्यापक मतदार जागृती कार्यक्रम होणार आहे. आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मतदार यादी 11 जानेवारीला प्रसिद्ध होणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादी (ता. 11) प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली. नागरिकांनी आपले नांव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. जिल्ह्यातील कुठल्याही नागरिकांचे नांव मतदार यादीत समाविष्ट नसल्याचे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन आनंदकर यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)