मतदारयाद्या घोळात मनपाचे 11 अधिकारी

नगर: महापालिका निवडणुकीत प्रभागनिहाय मतदार यादीत झालेल्या घोळात 11 अधिकारी व कर्मचारी दोषी ठरले आहेत. या दोषींना लवकरच कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या नोटिसांचा खुलासा आल्यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच 10 डिसेंबर रोजी जाहीर झाला.

निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी मतदार याद्यामधील झालेल्या घोळाच्या चौकशीचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यात 11 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीचा दि. 25 ऑक्‍टोबर रोजी प्ररारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीवर हरकती व तक्रारी करण्यासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत तब्बल 1 हजार 894 हरकती दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्याने प्रशासन देखील चक्रावून गेले होते. हरकतींचा पडलेला पाऊस पाहून प्रशासनालाही चुका लक्षात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका प्रभागातील मतदारांचे नाव दुसऱ्या प्रभागात गेलेले, दुबार मतदार आढळून आलेले, अचानक मतदार गायब झालेले, मतदारांचे नाव एक नाही तर तिसऱ्यात प्रभागात गेलेले. अशा स्वरूपाच्या हरकती दाखल झालेल्या होत्या. या हरकतीमुळे प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला होता. प्रंचड हरकती आल्याने या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे लक्षात आले. विशेषतः प्रभाग क्रमांक 2 मधील मतदाराचे नावे प्रभाग क्रमांक 3 व 4 मध्ये.

प्रभाग क्रमांक 15 मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 16 तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 15 मध्ये, प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 3 मध्ये. प्रभाग रचना व नकाक्षात जो भाग दाखविला आहे. ता मतदार यादीतून गायब झालेला अशा स्वरूपाच्या हरकती व तक्रारी दाखल झाल्या होत्या. सुमारे 1 हजार 894 हरकती दाखल झाल्याने प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला होता.

प्रभाग रचना व मतदार यादी तयार करतांना 51 मतदार केंद्र अधिकारी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षक व रचना व नकाक्षे तयार करण्यासाठी नगरचना विभागातील अभियंते यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. या सर्वांनी प्रभाग रचना व मतदार यादी तयार केली होती. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी अरूण आंनदकर यांनी मतदार यादी घोळाची चौकशी केली. अर्थात आंनदकर यांनी निवडणूक मतदानापूर्वीच अहवाल तयार केला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)