मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी उरले सात दिवस

पुणे – मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी आता शेवटचे सात दिवस राहिले आहेत. येत्या 31 ऑक्‍टोबरपर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याबरोबरच नाव-पत्यांमधील दुरुस्तीची संधी मिळणार आहे. दरम्यान, मतदार यादी अधिक अचूक होण्यासाठी व अधिकाधिक मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या रविवारी (दि.28) जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहीम आयोजित केली आहे. त्यामुळे घराजवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे सोयीचे होणार आहे.

2019 मध्ये एकाच वर्षात लोकसभा व विधानसभा दोन्ही निवडणुका होणार आहे. त्यामुळे मतदार यादी अद्ययावतीकरणाची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने ऑक्‍टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मोहीम आयोजित केली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी महाविद्यालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादी अचूक असावी, याकडे लक्ष दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या रविवारी सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहे. या अधिकाऱ्यांकडे नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज देता येणार आहे. त्याचबरोबर मयत, दुबार नावे मतदार यादीतून वगळणे, नाव-पत्यांमधील दुरुस्ती आदी कामे या मोहिमेत करता येणार आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना रविवारी मतदान यादीत नाव नोंदविणे शक्‍य होणार आहे. त्यांनी इतर दिवशी संबधित तहसिलदार कार्यालय अथवा विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय या ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)