मतदान यादीत नाव आहे का हे तपासा

 

खानापूर – निवडणुका जाहीर झाल्या आहेत. एक महिना सोशल मिडीयावर तुम्ही आम्ही प्रचारात मग्न असतो. नेतेमंडळी उमेदवारांची निवड, प्रसार माध्यमात चर्चासत्रात भाग घेणे, सभांचे नियोजन, प्रत्यक्ष सभांमध्ये भाषणे यामध्ये व्यस्त असतात. महिनाभर प्रचार केल्यावर त्याचे फळ आपल्याला मिळेल. मतदार घरातून बाहेर पडेल आणि आपल्याच मत देईल या आशेवर उमेदवार असतात. मतदानाचा दिवस उजाडतो आणि सकाळपासून वाहिन्यांवर बातम्या झळकू लागतात. उमेदवाराचेच नाव मतदान यादीतून गायब, हजारो मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित, कुणाच्या घरात एका मुलीचे नाव यादीत आहे, तर इतर सदस्यांची नावे गायब. तर कोणाच्या घरातील सर्व सदस्यांची नांवे यादीत आहेत तर एकाचे नांव गायब. काही घरातील सर्वच्या सर्व सदस्यांची नांवे गायब. मतदार यादीतील घोळाचे असे विविध नमुने त्या दिवशी ऐकायला, बघायला मिळतात.
काही मतदार आपले नाव सोशल साईटवर असल्याची अगोदर खात्री करून घेतात. पण, अश्‍या काही घटना घडल्या आहेत कि आयोगाच्या वेबसाईटवर नाव आहे, मात्र निवडणूक केंद्रात असलेल्या यादीत नाव नाही. म्हणून, त्यावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने आपलं नाव मूळ मतदार यादीत आहे कि नाही याची खात्री करून घेतली पाहिजे.
काहींनी नुकतीच आपली नावं निवडणूक आयोगाकडे नोंदवली असतील, त्याची पावतीही तुमच्याकडे असेल. पण जर मतदार यादीत तुमचं नाव अपडेट झालं नसेल तर तुम्हाला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळं ज्यांची नावं मूळ मतदार यादीतून गायब आहेत, काही कारणास्तव गहाळ झाली आहेत, त्यांना मात्र मतदानाची कुठलीही मुभा मिळणार नाही. त्यामुळे, मूळ मतदार यादीतजर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या हक्कापासून किमान या निवडणुकीत तरी वंचितच राहावं लागेल.
अनेकजण वाहिन्यांवर हातातील मतदार ओळखपत्र दाखवतात आणि आम्हाला मतदान करायला दिले नाही अश्‍या बाईट्‌स देताना दिसतात. तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असेल आणि मतदार यादीत नाव नसेल तरी तुम्हाला मतदान करता येणार नाही. कारण, मतदार ओळखपत्र दिल्यानंतरही मतदार स्थलांतरित होत असतात.
लक्षात ठेवा
(1) आत्ताच्या निवडणुकीसाठी जी अधिकृत यादी आहे, तिच्यात नाव असेल तरच मतदान करता येईल.
(2) आधीच्या निवडणुकीच्या यादीत असलेल्या नावाचा उपयोग नाही.
(3) या याद्या बऱ्याच आधी पक्क्‌या होतात. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर भांडून काही उपयोग नाही. उदाहरणार्थ या लोकसभा निवडणुकीची यादी 31 जानेवारीला प्रसिद्ध झाली.
(4) त्यामुळे आताच आपले नाव तपासून, ते गाळले गेले असेल तर काही धडपड करता येईल. जसा उशीर होईल, तशी आपली धडपड, त्रागा निष्फळ बनत जाईल.
केवळ निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नाव चेक करू नका. तहसील कार्यालयात जाऊन यादीत आपले नाव आहे का ते तपासा, असे आवाहन निवडणूक अधिकारी करीत असतात. त्याचे गांभीर्य लक्षात घ्या.

जर तुमचे नाव तुम्ही तहशील कार्यालयात जावून तपासलेत. तुमचे नाव आहे याची खात्री केलीत. तरी, काहीवेळा आपले नाव यादीतून गायब झालेले आढळते. अश्‍यावेळी, ज्यांची नावं मतदार यादीत आहेत, पण ङळीीं अर्थात ऍबसेंट म्हणजे गैरहजर, शिफ्टेड म्हणजे स्थलांतरीत झालेले आणि डेथ अर्थात मृतांच्या यादीत* गेली आहेत. त्यांना योग्य पुरावे सादर करुन मतदान करता येते असा निर्वाळा मागील वेळेस देण्यात आला होता. तरीही तुम्ही मतदानाच्या अगोदर खात्री करून घ्या.
निवडणूक आयोगाची सूचना 21 जानेवारीला अंतिम मतदार यादी निघणार
या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे 5 जानेवारी, 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. हि यादी महानगरपालिकेसाठी प्रभागनिहाय, जिल्हा परिषदेसाठी निवडणूक विभागनिहाय व पंचायत समित्यांसाठी निर्वाचक गणनिहाय विभागण्यात येईल. त्यावर 12 ते 17 जानेवारी 2017 पर्यंत हरकती दाखल करता येतील. त्यानंतर 21 जानेवारी, 2017 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
तेव्हा वेळ घालवू नका. आपले नाव यादीत असल्याची खात्री करा. नसल्यास आपली हरकत 12 ते 17 जानेवारी, 2017 दरम्यान दाखल करा. कारण, 21 जानेवारी, 2017 ला अंतिम यादी जाहीर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)