मतदान यादीतून नावे कमी करण्यासाठी खोटे अर्ज केल्याच्या विरोधात मोर्चा

कराड – मतदान यादीतून नावे कमी करण्यासाठी बोगस अर्ज केल्याच्या विरोधात सोमवारी मलकापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कराडचे प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी हिंमत खराडे यांना देण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र यादव, मोहन शिंगाडे, नारायण रैनाक, प्रशांत चांदे, दत्ता पवार, राहुल पोळ यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन मतदान नोंदणी व नावे कमी करण्याच्या यंत्रणेमार्फत (र्पीीं.ळिप पोर्टलद्वारे) मलकापूर शहरामध्ये 563 बोगस अर्ज नमुना 7 द्वारे ऑनलाईन पध्दतीने निवडणूक विभागाकडे अर्जदारांच्या संमतीविना बोगस व बनावट स्वरुपाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये मलकापूर नगरपरिषद निवडणूक 2019 मधील संभाव्य कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा समावेश दिसून येतो.

यामध्ये मनिषा प्रकाश चांदे, अश्‍विनी मोहनराव शिंगाडे वगैरे यांचा समावेश असून निवडणूक शाखेमार्फत संबंधितांना विचारणा करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतीय राज्य घटनेने सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये जो मताचा अधिकार दिला आहे. तो हिरावून घेवून त्यांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे.

या सर्व बाबी पाहता निवडणूक आयोगाच्या nvsp.in पोर्टलचा दुरुपयोग झाला असून त्याद्वारे अज्ञात इसमांनी संगनमताने मतदार व निवडणूक आयोगाची फसवणूक करुन गंभीर स्वरुपाचा अपराध केला आहे. यासंदर्भातील यादी मिळावी. अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनीही मागविली माहिती
260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर व कराड नगरपालिका क्षेत्रामध्ये ऑनलाईन पध्दतीने बेकादेशीर पध्दतीने मतदार यादीतील नावे कमी करण्याकरिता बोगस अर्ज प्रकरणाची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेत माझ्या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय नावे कमी करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती मिळावी. या मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांना दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)