मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क

श्रीगोंदा – वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आवश्‍यक आहे. आपले नाव मतदार यादीत न नोंदविल्यामुळे संबंधित मतदार मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्‍यक असल्याचे मत तहसीलदार महेंद्र माळी व्यक्त केले.

25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याबाबत घोषित केले आहे. त्यानुसार यावर्षी श्रीगोंदा येथील तालुका स्तरावरील राष्ट्रीय मतदान दिनाचा कार्यक्रम येथील महाराजा जीवजीराव शिंदे महाविद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी गोविंद दानेज तर व्यासपीठावर तहसीलदार महेंद्र माळी, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के उपस्थित होते. यावेळी नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना निवडणूक छायाचित्र मतदार ओळखपत्र समारंभपूर्वक देण्यात आले. तसेच मतदार जागृती संदर्भात झालेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)