मतदानासाठी सुमारे 4,400 वकिलांची नोंदणी

– पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणूक 
– सर्वोच्च न्यायालयाच्या “वन बार, वन वोट’ निर्देश
– मतदारांची संख्या निम्म्याहून अधिक घटली

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या “वन बार, वन वोट’ च्या निर्णयाचा परिणाम पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या मतदार नोंदणीवर झाला आहे. यावर्षी सुमारे 4 हजार 400 वकिलांनी मतदानासाठी नोंदणी झाल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. बिपीन पाटोळे यांनी दिली.

पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी दि.31 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री निकाल जाहीर होणार आहे. अध्यक्षपदासाठी चौघांनी अर्ज भरला आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी 6, तर सचिव पदाच्या दोन जागांसाठी 7 जणांनी अर्ज भरला आहे.

हिशेब तपासणीस पदासाठी दोन, खजिनदार पदासाठी एक आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी 28 जणांनी अर्ज भरला आला आहे. सोमवारी (दि.14) अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 16 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. दि.17 जानेवारी रोजी बार असोसिएशनच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. दि.29 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे उमेदवार मनोगत व्यक्‍त करणार आहेत.

मागील वर्षापर्यंत पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून वकील मतदान करत असत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या “वन बार, वन वोट’ चा परिणाम यावर्षी झाला आहे. या निर्णयाने वकिलाला एकाच बारच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. त्यामुळे वकील मतदारांची संख्या घटली आहे.

 मागील वर्षी निवडणुकीसाठी 10 हजारहून अधिक वकिलांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. मात्र, यावर्षी ही संख्या घटून सुमारे 4 हजार 400 पर्यंत आली आहे. शहरातील वकील मतदारांची नोंदणी झालीच आहे. मात्र, त्याचबरोबर ग्रामीण भागातील काही मतदारांनी त्यांच्या तालुका अथवा इतर बारऐवजी मतदानासाठी येथे नोंदणी केली आहे.

– ऍड. बिपीन पाटोळे, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा बार असो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)