मतदानासाठी महापालिका हद्दीतील आस्थापनांतील कामगारांना सवलत 

नगर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 9 डिसेंबरला होत आहे. त्यासाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचे मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी विविध आस्थापना, दुकाने निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांतील कामगारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्याची सूचना महापालिका उपायुक्तांनी केली आहे.

सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादी मालकांनी व व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन करावे. सवलत प्राप्त न झाल्यास कामगार मतदारांनी कामगार मतदान सहाय्यक कक्ष (0241) 2451852 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहायक कामगार आयुक्‍तांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)