मतदानासाठी नवीन ईव्हीएम मशिनचा वापर होणार

मतदानासाठी 404 कंट्रोल आणि 1213 बॅलेट युनिट उपलब्ध

नगर: महापालिका निवडणुकीसाठी नऊ डिसेंबरला मतदान होत आहे. हे मतदान नवीन मशिनवर होणार आहेत. महापालिकेच्या मतदानासाठी 337 मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाने नवीन ईव्हीएण मशिन आज दुपारी उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशिनची तपासणी फर्स्ट लेवल चेकिंगमार्फत सुरू आहे.

-Ads-

महापालिका निवडणुकीसाठी शहरात 17 प्रभाग आहेत. त्यातील 68 जागांवर 340 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना चिन्ह वाटप झाली आहे. त्याची यादी अपडेट करण्यात आली आहे. चिन्हासहीत मशिन व्यवस्थित आहेत का, याची फर्स्ट लेवल चेकिंग सुरू आहे. महापालिकेने मतदान प्रक्रियेसाठी सुमारे दोन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा प्रशासनाचे अधिकारी देखील यात सहभागी आहेत. महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे 404 कंट्रोल युनिट व 1213 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व ईव्हीएम मशिनची तपासणी सुरू आहे. या तपासणीवेळी राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व निवडणुकीतील उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अधिक मशिन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे उपायुक्त सुनील पवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)