मतदानादिवशी भोरचा आठवडे बाजार बंद

भोर- तालुक्‍यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदानाच्यादिवशी मंगळवारी (दि.21) भोरचा आठवडे बाजार जिल्हाधिकाऱ्याचे आदेशानुसार बंद राहणार असल्याची माहिती, भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच निवडणुकीच्या मतदानावर परिणाम होऊ नये या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून तसे तहसीलदारांना कळवण्यात आले आहे. मंगळवार (दि.21) नंतर आठवडे बाजार पूर्ववत सुरु राहिल, असे मुख्याधिकारी संजय केदार यांनी माहिती देताना सांगितले. मंगळवारी (दि. 21) भोरच्या आठवाडे बाजारा बरोबरच करंजगावच्या यात्रेच्या दिवशीचा बाजारही बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)