मणिपूरच्या पोलीस मुख्यालयातून 56 पिस्तुल गायब; एनआयए करणार चौकशी

इंफाळ – मणिपूूरच्या पोलीस मुख्यालयातून चार वर्षांत तब्बल 56 पिस्तुल आणिण 58 मॅगॅझिन्स गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याची शिफारस मणिपूर सरकारने केली आहे. पिस्तुल गायब होण्याचे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल तपास होण्याची गरज आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी स्पष्ट केले.

पिस्तुल गायब झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. याआधी 2016 मध्ये चौघांना एका पिस्तुलासह अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे सापडलेले पिस्तुल गायब झालेल्या पिस्तुलाच्या प्रकारातील होते. त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो, असा अंदाजही सिंह यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)