इम्फाळ – मणिपुरच्या तमेंग्लॉंग शहराच्या विविध भांगात दरडी कोसळून सात जण ठार झाले असून अन्य नऊ जण बेपत्ता झाले आहेत. या भागात पडत असलेल्या तूफानी पावसामुळे या दरडी कोसळल्या असून त्यात सात जण जखमी झाले आहेत.

बेपत्ता असलेले नऊ जण दरडींच्या ढिगाऱ्या खाली अडकले असावेत असा कयास आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी मदत पथके व अन्य यंत्रणा तेथे पाठवण्यात आली आहे.

दरडी हटवण्याच्या कामात मदत करण्यासाठी स्थानिक नागरीक आणि पोलिस तसेच अन्य सुरक्षा जवान कार्यरत आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून ती सुरूळीत करण्याचे कामही जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)