मणिपुरमधील आणखी दोन कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये

इम्फाळ – मणिपुरमधील आणखी दोन कॉंग्रेस आमदारांनी आज भाजपचा रस्ता धरला. त्यामुळे मणिपुरमधील भाजप आमदारांची संख्या आता 40 झाली आहे. मणिपुरची विधानसभा 60 सदस्यांची आहे.के. बी सिंग आणि पी ब्रजोन अशी पक्षांतर करणाऱ्या दोन कॉंग्रेस आमदारांची नावे आहेत.

विधानसभेत आता भाजपचे संख्या बळ 31 इतके झाले असून नागा पिपल्स फ्रंटच्या दोन आमदारांचा, नॅशनलिस्ट पिपल पार्टीच्या चार जणांचा आणि एका अपक्षाचाही भाजप सरकारला पाठिंबा मिळाल्याने हे सरकार आता चांगलेच भक्कम झाले आहे. मणिपुरमधील हे पहिलेच भाजप सरकार आहे. चालू वर्षीच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकूण 28 जागा होत्या व सर्वात अधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष पुढे आला होता. तथापी या 28 जणांपैकी 8 जणांनी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसकडे केवळ 20 आमदार उरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)