‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’चा दमदार टीझर लॉन्च  

गांधी जयंतीच्या निमित्ताने बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’चा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. या टीझरमधील राणी लक्ष्मीबाईच्या मुख्य भूमिकेत असणारी कंगना राणावतचा अभिनय आणि अॅक्शन सीन्स प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतील यात शंका नाही.

टीझरच्या सुरुवातीला महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येत असून इंग्रजांनी कशाप्रकारे भारतभूमीत प्रवेश करत राज्य करण्यास सुरुवात केली. इंग्रजांना विरोध करत राणी लक्ष्मीबाईंनी कशाप्रकारे लढा दिला, याचे वर्णन सांगत आहेत. दोन मिनिटाच्या या टीझरमध्ये आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.

-Ads-

मणिकर्णिका चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कृष जगाराला मुंडी यांनी केले आहे. या चित्रपटात  कंगना राणावतसह अंकिता लोखंडे, सूदही झळकणार आहेत. दरम्यान, या चित्रपटातून अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. टीझर आज प्रदर्शित झाला असला तरीही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)