“मणिकर्णिका’मध्ये कंगणाने हाताळले ऐतिहासीक हत्यारे

बॉलीवूडमधील कॉन्ट्रोवर्सी क्‍वीन कंगणा रणावत आपल्या आगामी “मणिकर्णिका’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला ये आहे. यात तिने झांशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. या ऐतिहासीक चित्रपटातील अनेक ठिकाणचे डायरेक्‍शन स्वतः कंगणाने केले असून चित्रपटातील ऍक्‍शन आणि स्टंटही तिने केलेले आहेत.

या चित्रपटाबद्‌दल कंगणाने सांगितले की, “मणिकर्णिका’चे शूटिंग करताना मी काही ऐतिहासीक अशा हत्यारांचाही वापर केला आहे. या चित्रपटातील एका दृश्‍यात 150 वर्षे जुने हत्यार हाताळले आहे. या हत्यारासह कंगणाने 5 किलोचे कवचही घातलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कंगणाने चित्रपटात अशाच तलवार आणि कॅपलॉक पिस्टला वापर केला आहे, जो की झांशीची राणी लक्ष्मीबाई वास्तविकपणे करत होत्या. याबाबतची संपर्ण माहिती कंगणाने आपल्या इंस्टाग्राम अंकाउंटवरून दिली आहे. तसेच कंगणासोबत झलकारी बाईच्या भूमिकेत मराठमोळी अंकिता लोखंडे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, कंगणा सध्या अश्‍विनी अय्यर तिवारी यांच्या “पंगा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत जस्सी गिल आणि नीना गुप्ताही भूमिका साकारत आहेत. “पंगा’मध्ये कंगणा एका कबड्डीपटूची भूमिका साकारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)