“मणिकर्णिका’च्या सेटवर पुन्हा जखमी झाली कंगणा

“मणिकर्णिका’च्या डायरेक्‍शनची जबाबदारी स्वीकारल्यापासून कंगणावर कामाचा प्रचंड ताण आला आहे. नुकतेच या सिनेमातील काही फोटो व्हायरल झाले. त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेतील कंगणा रक्‍ताने माखलेली दिसत होती. त्यामुळे कंगणाला पुन्हा अपघात झाला असावा अशी जोरदार चर्चा सुरू झाली. याच सिनेमाच्या तयारीच्यावेळी कंगणा एकदा घोड्यावरून पडली होती. तर एकदा तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षकाची तलवार तिच्या कपाळावर आदळली होती. त्यामुळे तिला जबरदस्तीने विश्रांती घ्यायला लागली होती. आता पुन्हा तसेच काही घडले असावे, असा अंदाज होता.

पण आता प्रत्यक्ष युद्धाच्यावेळचे शुटिंग सुरू आहे. त्यामुळे जखमी झालेली राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कंगणाच्या अंगावर रक्‍ताचे डाग दिसत होते. या सिनेमातून सोनू सूदनेही माघार घेतल्याने आता त्याच्या रोलमध्ये नवीन कलाकाराला घेऊन जुन्या सीनचे पुन्हा शुटिंग करावे लागणार आहे. तसेच 10 दिवसांच्या पॅचवर्कचे काम करायला आता 45 दिवस लागणार आहेत. या सगळ्यामुळे प्रोड्‌युसरवर 20 कोटी रुपयांचा जादा बोज पडणार आहे. शिवाय सिनेमा ठरवलेल्या तारखेला रिलीज होऊ शकणार नाही, याचीही धास्ती आहेच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)