मढ येथे यशवंतराव कला, क्रीडा महोत्सव उत्साहात

बीट पातळीवर सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

ओतूर- पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सव अंतर्गत मढ (ता. जुन्नर) येथे बीट पातळीवर शुक्रवार (दि. 30) क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धचे उदघाटन मढ गावचे उपसरपंच संतोष मस्करे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मढ बीटचे विस्तार अधिकारी अनिता शिंदे, केंद्रप्रमुख बी. एम. घोटकर, सुरेश भवारी, रसाळ, मुख्याध्यापक निवृत्ती खुटाण, लांडे, अशोक मस्करे, पंकज हिलम, जुन्नर तालुका पतसंस्थेचे माजी सभापती गणेश ढमाले, महिला आघाडी अध्यक्षा सुषीला डुंबरे तसेच सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आली. या स्पर्धचे सूत्रसंचालन रवींद्र पानसरे यांनी केले, तर आभार योगिता बुट्टे यांनी मानले.

  • सांघिक स्पर्धा
    कबड्डी मुले – प्रथम क्रमांक (पिंपळगाव जोगा), मुली प्रथम क्रमांक (पिंपळगाव जोगा), खो खो मुले प्रथम क्रमांक (पिंपळगाव जोगा), मुली प्रथम क्रमांक (मुथाळणे), लंगडी मोठा गट प्रथम मुले (सितेवाडी), मुली (पिंपळगाव जोगा), लेझीम मुले, मुली प्रथम (मुथाळणे), भजन लहान गट प्रथम (बारकी वसईवाडी), मोठा गट (मुथाळणे), लोकनृत्य लहान गट प्रथम (मुथाळणे), मोठा गट (करंजाळे),
  • वैयक्तिक स्पर्धा
    50 मी. धावणे लहान गट मुले – प्रथम लांडे (करंजाळे), मुली स्नेहल गवारी (सितेवाडी), मोठा गट 100 मी. धावणे मुले – प्रथम आदित्य कुमकर (पिंपळगाव जोगा), मुली प्रथम – आकांक्षा हांडे, चेंडू फेक मुले प्रथम – सुमित लांडे (करंजाळे), मुली श्रावणी हांडे (पिंपळगाव जोगा), गोळा फेक मुले प्रथम – आदित्य कुमकर (पिंपळगाव जोगा), मुली प्रथम श्वेता घाडगे (पिंपळगाव जोगा), उभी उंच उडी मुले प्रथम – रोहित गाडे, मुली – जागृती मोजाड (सितेवाडी), धावती उंच उडी मुले प्रथम – यश सस्ते (पिंपळगाव जोगा), मुली प्रथम – वेदिका गुंजाळ (पिंपळगाव जोगा), मोठा गट धावती उंच उडी मुले प्रथम – आदित्य कुमकर (पिंपळगाव जोगा), मुली प्रथम आकांक्षा हांडे (पिंपळगाव जोगा), वक्तृत्व स्पर्धा लहान गट प्रथम – मानसी हांडे (पिंपळगाव जोगा), मोठा गट प्रथम पूजा हांडे (पिंपळगाव जोगा).

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)