मढ येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

ओतूर -मढ (ता. जुन्नर) येथे तरुणाने राहत्या घरात पाळण्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 26) दुपारी उघडकीस आली. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार आर. बी. पवार म्हणाले, मढ येथे योगेश कमलाकर दिधे (वय 30) याने राहत्या घरात पाळण्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत त्याचे मामा प्रभाकर बबन मस्करे यानी ओतूर पोलिसांत खबर दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिसांनी आकस्मित मयत म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)