मढ येथे गोबर, रुबेला लसीकरण मोहीम कार्यशाळा

ओतूर- मढ (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुकवारी (दि. 2) मढ परिसर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी आणि केंद्रप्रमुख यांची गोबर आणि रुबेला लसीकरण मोहीम अंतर्गत कार्यशाळा झाली. याबाबत मार्गदर्शन करताना आरोग्य सहायक व्ही. एन. तांबे यांनी सांगितले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारचा हा गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम आहे. रुबेला तसेच गोवरशी संबंधित न्युमोनिया, अतिसार आणि मेंदूज्वर यांसारख्या प्राणघातक परिणांमापासून बालकाचे रक्षण व्हावे, यासाठी लसीकरण हा एकमेव संरक्षक उपाय आहे. हा कार्यक्रम 27 नोव्हेंबर 2018 पासून सुरू होणारी ही मोहीम सर्व शाळा, सामुदायिक सत्र, अंगणवाडी केंद्र, सरकारी आरोग्य केंद्रावर पाच आठवडे चालणार असून, त्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना गोबर, रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांसाठी गोवर, रुबेला माहितीपत्रके आणि प्रमाणपत्र वाटण्यात आलेले आहे, तसेच प्रशिक्षित आरोग्य कार्यकत्याद्वारे बालकांना लस टोचली जाणार आहे. याबाबतचे सर्व वेळापत्रक आणि नियोजन तयार झालेले आहे. यावेळी जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्‍याम बनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती सारोक्ते, आरोग्य सहायक व्ही. एन. तांबे, पल्लवी रोकडे, आरती कुमकर, एन. बी. ननवरे, व्ही. सी. वरे, केंद्रप्रमुख सुरेश भवारी, बारसु घोटकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)