मढेवडगावात ट्रॅक्‍टरला धडकून महिला ठार

रस्त्याबाजूला उभ्या ट्रॅक्‍टरला दुचाकीची धडक

श्रीगोंदा – नगर – दौंड रस्त्यावर मढेवडगाव नजीक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्‍टरला दुचाकी धडकून माध्यमिक शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सव्वासातच्या सुमारास घडली.

अर्चना राजेंद्र शेळके(वय 35) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या काष्टी येथील जनता माध्यमिक विद्यालयात कार्यरत होत्या. नगर -दौंड रस्त्यावर मढेवडगावनजीक मुरूम वाहतूक करणारा एक ट्रॅक्‍टर डिझेल संपल्यानेरस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला होता. अंधारात हा ट्रॅक्‍टर व ट्रॉली न दिसल्याने अर्चना शेळके यांची दुचाकी ट्रॉलीला मागून धडकली. जोरदार धडकेमुळेगंभीररित्या जखमी होऊन अर्चना शेळकेजागीच ठार झाल्या. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)