मढी येथील आश्रमशाळेत मुलींचा विनयभंग

पालकांकडून चोप; पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल
पाथर्डी – तालुक्‍यातील मढी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलींचा शाळेच्या व्यवस्थापकासह एका शिक्षकाने विनयभंग करण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. दोघांची पालकांकडून धुलाई करण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेतील दोन्हीही आरोपींची मुलींच्या पालकांनी धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि तालुक्‍यातील मढी येथे चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळा असून या शाळेतील अधीक्षक नामदेव बबन धायतडक (रा.पालवेवाडी) व शिक्षक ईश्‍वर सुखदेव सुरशे (रा.चितळी ता. पाथर्डी) या दोघांनी आश्रमशाळेत पाचवी ते सातवीत शिकत असलेल्या मुलींशी मंगळवारी सायंकाळी गैरवर्तन केले. या मुली घोटन, तिसगाव व सोनईमधील आहे. यातील घोटन येथील मुलींनी आपल्या पालकांना या घटनेची माहिती देताच या मुलींचे पालक मढी येथे दाखल झाले. सर्व प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी तिसगाव व सोनई येथील मुलींच्या पालकांना तातडीने बोलवून घेतले. या नंतर सर्वच पालकांनी या दोघा जणांची धुलाई करत पोलिसांना पाचारण केले.
मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी धायतडक व सुरशे या दोघा विरोधात विनयभंग व बालकाचे लैंगिग अत्याचारापासुन संरक्षण व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे हे करत आहेत. शिक्षक दिन तालुक्‍यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना हा प्रकार घडल्याने तो चर्चेचा विषय ठरला असुन गेल्या एक वर्षापासुन हा प्रकार घडत असल्याचे या घटनेतील तीन मुलींनी पोलिसांना सांगितले. हा प्रकार घडल्या नंतर काही मुलींनी आश्रम शाळेतुन घरी जाणे पसंद केले. पोलिसांनी चौकशीसाठी दोघाही शिक्षकांना ताब्यात घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)