मढी देवस्थानच्या सचिवपदी मरकड यांची निवड कायम

पाथर्डी – मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या सचिवपदी सुधीर मरकड यांची निवड कायम ठेवून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी माजी सचिवाची तक्रार निकाली काढली. सहाय्यक आयुक्त श्रीमती ए. पी.दिवाण यांनी निर्णय दिल्यानंतर सचिव म्हणून सुधीर मरकड यांनी अधिकृतपणे कामकाज पाहण्यास प्रारंभ केला.
या बाबत माहिती देताना मरकड म्हणाले 13 एप्रिल 2017 रोजी तत्कालिन सचिव आप्पासाहेब मरकड यांनी पदाचा राजीनामा स्वखुशीने दिला. त्याच्या जागी सुमारे दहा दिवसांनंतर सुधीर मरकड यांची नियुक्ती होऊन पदाधिकारी बदलाचा अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी 4 ऑक्‍टोबर 2018 ला अंतिम निकाली काढत सुधीर मरकड यांची निवड वैध ठरवली. नियुक्‍ती झाल्यापासून सर्व व्यवहार वैद्य ठरविण्यात आले आहेत. सध्याच्या विश्‍वस्त मंडळापैकी शिवशंकर राजळे, आप्पासाहेब मरकड, मधुकर साळवे, मिलिंद चंवडके या सलग सहा सभांना गैरहजर राहणाऱ्या विश्‍वस्तांना पदमुक्त करून सर्व कायदेशीर बाजूची पडताळणी करून त्यांचे विश्‍वस्तपद रद्द केले आहे. त्यामुळे त्यांनी काढलेली बैठक व अन्य कामकाज नियमाबाह्य केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बहुमताने करण्यात आली. सलग सभांना गैरहजर राहिल्यास देवस्थान समितीच्या घटनेतील कलम 11 (8) यामध्ये विश्‍वस्तपद रद्द करण्याची तरतूद आहे, असे मरकड म्हणाले.
दरम्यान असाच प्रश्न अध्यक्षपदाबाबत निर्माण झाला असून विश्‍वस्त मंडळात सुद्धा दोन अध्यक्ष कार्यरत आहेत. बैठकीचा बदली अहवाल आतापर्यंत सहाय्यक धर्मादाय आयुक्‍तकडून स्वीकारला न गेल्याने अण्णासाहेब मरकड बहुमताने झालेले अध्यक्ष तर शिवशंकर राजळे पूर्वीचे अध्यक्ष असे दोन अध्यक्ष आहेत. सह्यांचे अधिकार राजळेकडे असून यामुळे दैनंदिन विकास कामांना चालना मिळत नाही कोट्यवधीचा निधी पडून आहे. त्यामुळे बदली पदाधिकारीचा अहवाल त्वरित स्वीकारून विश्‍वस्त मंडळाचे कामकाज सुरळीत चालू देण्याची मागणी विश्‍वस्त मंडळाने बहुमताने धर्मादाआयुक्‍तांकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)