“थर्टीफर्स्ट’चे निमित्त
पुणे- थर्टीफर्स्टच्या पार्ट्यामुळे मांसाहारी पदार्थाला मागणी वाढली आहे. त्यामुळे रविवारी नेहमीच्या तुलनेत मटण, मासळी, चिकनच्या मागणीत तब्बल तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: हॉटेल, खानावळ, केटरींग व्यावसायिकांकडून मोठी खरेदी झाली.
रविवारी गणेश पेठ येथील मार्केट यार्डात खोल समुद्रातील मासळीची 12 ते 14 टन, खाडीच्या मासळीची 300 ते 400 किलो आणि नदीतील मासळीची 700 ते 800 किलो किलो, आंध्र प्रदेश येथून रहु, कतला आणि सिलनची मिळून 12 ते 14 टन आवक झाली आहे.
या आठवड्यात चिकनच्या भावांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, भावांत विशेष बदल झाला नाही. पुरवठाही चांगला असून, इंग्लिश अंड्यांच्या प्रति शेकड्याच्या भावांत तीस रुपयांनी वाढ झाली. गेल्या आठवड्यात घट झाली होती. गावरान अंड्याच्या भावांत बदल झाला नाही. या दोन्ही अंड्यांचे डझन आणि किरकोळ विक्रीचे भाव टिकून आहेत.
भाव (प्रतिकिलो)
पापलेट कापरी ः 1400, मोठे ः 1400, मध्यम ः 900, लहान ः 750-800, भिला ः 550, हलवा ः 480-550, सुरमई ः 400-480, रावस लहान ः 480, मोठा ः 650, घोळ ः 520, करली ः 280, करंदी ( सोललेली ) ः 240, भिंग ः 240, पाला : 700 – 1200, वाम ः पिवळी 480, काळी : 280, ओले बोंबील ः 100-120, कोळंबी लहान : 400, मोठी : 480, जंबोप्रॉन्स : 1500, किंगप्रॉन्स ः 800, लॉबस्टर ः 1500, मोरी : 280 मांदेली : 100, राणीमासा : 160, खेकडे : 200, चिंबोऱ्या : 480
खाडीची मासळी
सौंदाळे ः 240, खापी ः 240, नगली ः 360, तांबोशी ः 320, पालू ः 240, लेपा ः 120 -200, शेवटे : 160-240, बांगडा : 120-160, पेडवी ः 50, बेळुंजी ः 100, तिसऱ्या : 180, खुबे : 120, तारली : 100.
नदीची मासळी रहू ः 150, कतला ः 180, मरळ ः 480, शिवडा : 160, चिलापी : 60, मांगूर : 140, खवली : 180, आम्ळी ः 60, खेकडे ः 160, वाम ः 480
——-
मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे ः 440, खिमा ः 440, कलेजी : 480
—
चिकन : चिकन ः 150, लेगपीस : 180, जिवंत कोंबडी : 120, बोनलेस : 260
—–
अंडी
गावरान : शेकडा : 780, डझन : 108, प्रति नग : 9, इंग्लिश शेकडा : 400, डझन : 60, प्रतिनग : 5
चौकट
व्यापाऱ्यांनी केली होती तयारी
जुन्या वर्षाला निरोप देताना रविवारी सकाळपासूनच मांसाहारी पदार्थांना पुणेकरांची मागणी वाढली होती. विशेषत: हॉटेल, केटरिंग आणि खानावळ व्यावसायिकांकडून चांगली खरेदी झाली होती. घरगुती ग्राहकही मटण, चिकन आणि मासळीच्या दुकानाबाहेर रांगा लावून खरेदी करताना दिसून आले. मागणी अधिक असणार हे लक्षात घेत व्यापाऱ्यांनी देखील पूर्वतयारी केली होती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा