मटका किंगचा खून करणाऱ्या 21 जणांवर मोक्का

बारामती पोलिसांची कामगिरी : धन्या कांबळे टोळीचाही समावेश

बारामती- शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा जाधवचा 5 नोव्हेंबरला निघृण खून करणाऱ्या 21 जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय खंडणी, दरोडे व जबरी चोऱ्या करीत बारामती परिसराच्या नाकात दम आणणाऱ्या धन्या कांबळे याच्या टोळीलाही मोक्का लावण्यात आला आहे.
बारामतीत मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांचा 5 नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. याप्रकरणी 21 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 12 आरोपींना अटक केली असून त्यात चार अल्पवयीनांचा समावेश आहे. अन्य 9 आरोपी फरार आहेत. या सर्वांवर आज (गुरुवारी) मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दिनेश रावसाहेब उर्फ पांडूरंग वायसे, विनोद शिवाजी माने, गणेश विठ्ठल माने, अनिल संभाजी माने, सुनील संभाजी माने, प्रेम दिनेश वायसे, अविनाश उर्फ अवी प्रदीप जाधव, संदीप दत्तू माने, गुलाब उत्तम माने, कुंदन उर्फ बाळा दत्तात्रय जाधव, सागर सुभाष शेळके, अविनाश उर्फ साड्या हनुमंत साडेकर, महेश विठ्ठल माने व अक्षय संजय भोसले अशी मोक्का लागलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस मुख्यालयात तालुका पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या प्रस्तावात खंडणी, जबरी चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यातील धन्या उर्फ योगेश गोकूळ कांबळे, रोहित दादा जगताप, सचिन उर्फ बाज्या राजेंद्र काळे या चौघांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)