मटका अड्ड्यावर छापा, एकास अटक

फलटण, दि. 3 (प्रतिनिधी) – फलटण पोलिसांनी केलेल्या मटका कारवाईत एकास अटक करण्यात आली. या कारवाईत 1060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 3 रोजी फलटण शहरातील सुपर मार्केटमधील भाजी मंडईत बंद गाळ्याचे आडोशाला अचानक छापा टाकून कल्याण नावाचा मटका घेत बसलेल्या सुरज दत्ता बोराटे वय 28 रा. रविवार पेठ फलटण यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे 1060 किंमतीचा मुद्देमाल करण्यात आला. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथक उपविभागीय पोलिस कार्यालयामधील पो. कॉ खराडे, कदम, सांडगे, लावंड व पो. हवालदार काकडे, येळे यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी पो. कॉ कदम यांनी गुन्ह्याची फिर्याद दाखल केली असून सदरचा तपास पो.हा येळे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)