मजुराला भर दिवसा लुटले

पिंपरी – भर दिवसा धमकी देत तीन इसमांनी एका मजुराला लुटले. ही घटना भक्ती-शक्ती निगडी येथे सायंकाळी सहा वाजता घडली.

प्रेम सुंदर मारवाडी (वय-18, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) याने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तीन अज्ञात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उभे असताना आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना धमकी देत बाजूला चल, असे सांगितले. यावेळी फिर्यादीला रस्त्याच्या बाजूला नेले व तेथे फिर्यादीच्या खिशातील मोबाईल फोन व रोख दीड हजार रुपये असा एकूण 8 हजार 500 रुपयांचा ऐवज लुबाडून नेला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)