मजुरांना घेवून जाणारा ट्रॅक्‍टर उलटला, 2 ठार 8 जण जखमी

नांदेड – ओव्हरलोडमुळे ट्रॅक्‍टर चालकाचा ताबा सुटून उलटल्याने पश्‍चिम बंगालचे 2 मजूर ठार तर 8 जण जखमी झाले. ही घटना 30 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता नांदेड -हैद्राबाद महामार्गावर कुष्णूरजवळ घडली. जखमीपैकी चौघे गंभीर आहेत.

कुष्णूर औद्योगिक वसाहतीसाठी घुंगराळा येथे 220 के. व्ही. च्या विद्युत केंद्राचे काम चालू आहे. विद्युत वाहिनीचे काम करण्यासाठी ठेकेदारांने पश्‍चीम बंगाल येथील कामगार आणले होते. त्या ठिकाणीच राहत होते. तेथूनच दररोज विद्युत वाहिनीच्या मनोऱ्याचे काम करण्यासाठी जात असत. दि.30 डिसेंबर रोजी वीस ते बावीस कामगार लोखंडी पोल व साहित्यासह ट्रक्‍टरवर बसून निघाले होते. ट्रकॅंटरच्या ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान असल्याने चालकाचा ताबा सुटला.

यात इब्राहीम मकबूल महम्मद (25) व राहूल शमशोद्दिन (20) हे दोघे जागीच ठार झाले. तर आठ जण जखमी झाले. यातील चौघांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे तर 4 जणांवर नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीत मनोज मुसर वय (33), झगडू मुसर (35) संजय मुसर (30) आनंद रुपी (25) सर्व राहणार पश्‍चीम बंगालमधील तालुका पोखरिक गाव मनरपूर जिल्हा मालदा येथील रहिवासी आहेत. अन्य चार जखमीची नावे समजू शकली नाहीत.

सदरील अपघाताची माहिती समजताच कुंटूरचे पोलीस उपनिरीक्षक बिराजदार, जमादार कुंभरे व इतर कर्मचारी घटनास्थळी आले. व मयतांना उत्तरीय तपासणीसाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मयत व जखमी हे पश्‍चिम बंगालचे रहिवासी असल्याने सदरच्या अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. मात्र अपघातानंतर ट्रक्‍टर चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)