मजबूत आणि सर्वात मोठी – अल्ट्राटेक सिमेंट

फार फार वर्षांपूर्वी सिमेंट हे सरकारच्या हातातले हुकुमाचे पान होते. सिमेंटची खरेदी करण्यासाठीदेखील परवानगी घ्यावी लागायची. सिमेंटच्या अनुउपलब्धतेमुळे कित्येक घरे, सदनिका, इमारती अर्धवट राहात असत. सिमेंट जसे मिळेल, तसे मुंगीच्या गतीने बांधकाम होत असे. त्याच 80 व्या दशकात ग्रासिम सिमेंटचा कारखाना मध्यप्रदेशात सुरु झाला. ग्रासिम ही बिर्लांची कंपनी, जी पुढे कुमारमंगलमबिर्ला यांच्यासारख्या धडाडीच्या उद्योजकाच्या हातात आली.

हळूहळू बांधकाम क्षेत्र, रस्ते बांधणीसारख्या पायाभूत सुविधा झपाट्याने वाढू लागल्या आणि त्यासाठी अर्थातच सिमेंटची गरज वाढत चालली. त्याच वेळी सिमेंट उद्योगही सरकारी जाचातून बाहेर पडू लागला होता. ग्रासिमनेही छोटे छोटे सिमेंट उद्योग ताब्यात घेण्यास सुरवात केली आणि चक्क एल अँड टी या प्रसिद्ध कंपनीमध्ये गुंतवणूक सुरु केली. 2003-04 च्या सुमारास एल अँड टीने आपला सिमेंट उद्योग इतर व्यवसायापासून वेगळा केला. हीच कृती ग्रासिमनेही केली आणि आपला सिमेंट उद्योग समृद्धी सिमेंट लिमिटेड’ या स्वतंत्र नावाने चालू केला. काही वर्षातच एल अँड टीचे सिमेंट युनिट ताब्यात घेऊन अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडया कंपनीत सर्व सिमेंट उद्योग एकत्र केले गेले. अशा प्रकारे अल्ट्राटेक सिमेंट ही भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी झाली.

आज भारतात अल्ट्राटेक सिमेंटची एकत्रित क्षमता वर्षाला 9 कोटी 65 लाख टनांपेक्षा अधिक आहे. आज या कंपनीचे 19 कारखाने, एक व्हाईट सिमेंटचा कारखाना, दोन वॉलकेअर पुट्टीचे कारखाने, 21 ग्राइंडीग युनिट, सहा टर्मिनल्स आणि चक्क पाच जेट्टी त्यांच्या ताब्यात आहेत. याचबरोबर भारतभर 100 रेडीमिक्‍स सिमेंटप्लॅंटस आहेत. बांधकामासाठी तयार सिमेंट घेऊन जाणारे मोठमोठे ट्रक्‍स आपल्याला सर्वत्र दिसतात, या क्षेत्रात हा मोठा बदल या कंपनीमुळे झाला. आज मोठ्या शहरात मोठ्या बांधकामात हेच रेडीमिक्‍स वापरले जाते.

-Ads-

आज युनायटेड अरब अमिरातीमध्येही अल्ट्राटेक सिमेंट ही सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. श्रीलंकेतही या कंपनीकडे एक मोठे टर्मिनल आहे. कंपनीचीब्रॅंड व्हॅल्यू खूप मोठी आहे. त्यांची उत्पादने खूप प्रसिद्ध आहेत. बिर्ला व्हाईट’ हे नाव लोकप्रिय झाले आहे. बिर्ला व्हाईट बरोबर वॉलकेअर पुट्टी, लेव्हल प्लास्ट, टेक्‍सचुरा, ग्लास फायबर रीफो कॉन्क्रीट ही उत्पादने इंजिनियर आणि आर्किटेक्‍ट लोकांची आवडती उत्पादने आहेत.

अल्ट्राटेक सिमेंट, सुपर सिमेंट, प्रीमियम सिमेंट, टाईल्स लावण्यासाठी टाईल्स फिक्‍सो, याच बरोबर प्लस, ड्युरोकॉन, कलरकॉन, फायबरकॉन, थर्मोकॉन असे अनेक विविध उपयोगासाठी लागणारी उत्पादने अल्ट्राटेक बनविते.

500 पेक्षा अधिक वेअर हाउसेस, 150 पेक्षा जास्त रेल्वेहेड्‌स असणारी ही कंपनी दररोज सुमारे 14 हजार पेक्षा जास्त मागणीदारांना माल पुरविते. आज 50 हजार पेक्षा अधिक डीलर, रिटेलर्स, कंपन्याकडून मागणी येत असते. या कंपनीची प्रगती पुढील आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल.

आता तर कोणतेही सरकार असो पायाभूत सुविधा, घरे, विमानतळांपासून गावागावात सिमेंट रस्तेबांधणी या सर्वांसाठी सिमेंट हे लागतेच. मग त्यातील सर्वात प्रसिद्ध अल्ट्राटेक सिमेंटला जास्त मागणी, हे ओघाने आलेच! मग आपण का सिमेंटसारखे या कंपनीच्या शेअरला चिटकून बसायचे नाही?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)