मच्छी-मटन मार्केटमध्ये अस्वच्छतेचा कहर

पिंपरी – महापालिकेच्या पिंपरीतील मच्छी आणि मटन मार्केटमध्ये अस्वच्छता पसरली आहे. चेंबर साफ न केल्यामुळे ड्रेनेजही तुंबले आहेत. महापालिकेला कराचा भरणा करूनही असुविधांचा सामना करावा लागत असल्याने विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील लाल बहादूर शास्त्री बाजार मंडई जवळ असलेल्या मटन मार्केटची स्थापना होऊन पस्तीस वर्ष झाले आहेत. एवढ्या वर्षात पालिकेने एकदाही मार्केटची डागडूजी केली नाही. सांडपाणी सोडण्यासाठी असलेले पाईप तुंबले आहेत. त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी नाली काढण्यात आली आहे. परंतु, चेंबर तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या मटन मार्केटमध्ये सफाई कर्मचारी येत नाहीत.

सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याने येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. मटन मार्केटच्या गाळ्यांची देखील दुरावस्था झाली आहे. गाळ्याच्या विटा आणि पत्रे फुटले आहेत. पावसाळ्यात दुकानातून पाणी उपसण्याची वेळ येत आहे. विक्रेत्यांना स्वर्खानेच साफसफाई करावी लागत असल्याची माहिती मटन विक्रेते तन्वीर शेख यांनी दिली.

येथेच असलेल्या मच्छी मार्केटलाही असुविधेने ग्रासले आहे. संपूर्ण मंडईत पावसाच्या पाणी शिरत आहे. त्यामुळे पाणी उपसण्यात त्यांचा वेळ जातो. महापालिकेला नियमित कर भरत असूनही कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. साफसफाई करायला कर्मचारी येत नसल्याची माहिती मच्छी विक्रेत्या लक्ष्मी बाळुहाते यांनी दिली. या मच्छी मार्केटचे विशेष म्हणजे येथे विक्रेता सर्व महिलाच आहे. परंतु, त्यांना स्वच्छतागृह नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. दहा वर्षीपूर्वी स्वच्छतागृहावर झाड पडले होते. त्यामुळे ते मोडकळीस आले. तेव्हापासून त्याची डागडूजी झाली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)