सोमाटणे-महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिरगाव येथील शारदाश्रम शाळेचे पदवीधर शिक्षक मच्छिंद्र भगवान कापरे यांना देण्यात आला. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भुवन झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला.
यावेळी संघाचे राज्य अध्यक्ष बी.एस. मुंडे, उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, कार्याध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एच. डी. डोंगरे, विशाल तांबे आदी उपस्थित होते. उषा दीपक कासार यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्र व फेटा देवून पुणे जिल्ह्यातील आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. कापरे यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्य व डोंगर दऱ्यात जवळपास 200 झाडे लावून ती जागविली. तसेच त्यांची योग्य ति निगा राखली तसेच त्यांचे पालकत्व देखील स्वीकारले असे सामाजिक कार्या आदी कार्यांची दाखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला व कासार यांनी शाळेतील बाल चिमुकल्यांच्या आरोग्याची काळजी घेत सुरुवातीला चुलीवर स्वयंपाक तयार करून खाऊ घातला व त्यांच्या आरोग्याची उत्तम अशी काळजी घेतली या बद्दल या दोघांना हा पुरस्कार मिळाला असल्याची माहिती मुख्याध्यापक विजय लोखंडे यांनी दिली.
कापरे व कासार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी, मुख्याध्यापक विजय लोखंडे, रमेश फरताडे, बद्रीनारायण पाटील यांनी अभिनंदन केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा