मगर स्टेडियमवरील सुरक्षा रक्षकांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी- नेहरुनगर येथे आण्णासाहेब मगर स्टेडियमवर अतिक्रमणातून जप्त केलेले साहित्य ठेवले आहे. त्या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही. डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे अतिक्रमण साहित्याची सुरक्षा करताना सुरक्षारक्षकांचेच आरोग्य धोक्‍यात आले आहे.

अतिक्रमण विभागात नेमलेल्या सुरक्षा रक्षक, मदतनीस यांना महापालिकेची वाहने सोडण्यासाठी नेमलेले कर्मचारी शिविगाळ करत आहेत. त्यांना अनेक वेळा उद्धट भाषा वापरून धमकविले जात आहे. मैदानातील एका ठिकाणी अतिक्रमणचे साहित्य टाकून दिले आहे. या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार असतो अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चोरांना रोखण्यासाठी गेल्यास चोरट्यांकडून मारहाण होण्याची भिती सुरक्षारक्षक व्यक्‍त करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी विजेची व्यवस्था करावी अशी मागणी ते करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साहित्य ठेवलेल्या ठिकाणी सीमाभिंतदेखील बांधण्यात आलेली नाही. जप्त केलेल्या साहित्यांमध्ये टायर, पानटपऱ्यांचा समावेश आहे. पावसामध्ये या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. अडगळीच्या साहित्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. औषध फवारणी केली जात नाही. मैदानाच्या शेजारीच रहिवासी घरे आहेत. त्यांनाही डासांचा त्रास होऊन साथीचे आजार पसरत आहेत. या बाबत अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मदत मागूनही ते कोणतीच मदत करत नसल्याची तक्रार नॅशनल सिक्‍युरिटी सर्व्हिसेस या संघटनेच्या वतीने करण्यात आली. आयुक्‍तांनी यामध्ये लक्ष घालून संबंधीतांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)