मगर स्टेडियमचा “पीपीपी’वर विकास

पिंपरी – नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित करण्यात येणार आहेत.

साधारणतः दोन वर्षांपूर्वी स्टेडियमच्या आवारातील जलतरण तलावामधून पाणीगळती होत असल्याची समस्या निर्माण झाली होती. त्याचवेळी स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीच्या कठड्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे तलावाबरोबरच संपूर्ण स्टेडियमचेच स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार पालिकेच्या स्थापत्य विभागाने त्रयस्थ संस्थेकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करून घेतले होते. त्यात मगर स्टेडियमची इमारत जवळपास 40 वर्षे जुनी झाल्याने धोकादायक बनल्याचा निष्कर्ष संबंधित संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आला होता.

-Ads-

स्टेडियममधील पालिकेच्या क्रीडा विभागाचेही अजमेरा कॉलनीमधील तंत्रनिकेतन शाळेत स्थलांतर करण्यात आले. चार दिवसांपूर्वीच स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीच्या कठड्याचा काही भाग धोकादायक बनल्याने पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून काढण्यात आला. स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. 27) झालेल्या बैठकीत मगर स्टेडियम “पीपीपी’ तत्त्वावर विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली. निविदापूर्व कामासाठी वास्तुविशारद मे. शशी प्रभू अँड असोसिएट्‌स यांची नेमणूक करण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)