मगर जलतरण तलावावर टवाळखोरांचा त्रास

पिंपरी – सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरु असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या 12 जलतरण तलावावर पोहणाऱ्यांची एकच गर्दी होत आहे. अण्णासाहेब मगर जलतरणावरील गर्दीला आवरणे तलतरण तलावाच्या कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना स्थानिकांकडून फुकट सोडण्यासाठी तर काही वेळा रांगेत उभे न राहता तिकीट देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे जलतरण तलावाचे कर्मचारी सध्या तणावाखाली काम करताना दिसत आहेत.

नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर जलतरण तलाव सध्या गर्दीमुळे गजबजलेला असतो. मात्र येथील स्थानिकांकडून कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी काही टवाळखोर दुपारी मुद्दाम दारु पिऊन येवून फुकट सोडण्यासाठी तसेच तिकीट खिडकीला न थांबता तिकीट मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना वांरवार धमकावत आहेत. त्यांच्या अंगावर धावून जात आहेत. हा प्रकार वांरवार घडत असल्याने येथील कर्मचाऱी तणावाखाली काम करत असल्याचे दिसून आले.

हे टवाळखोर स्थानिक राजकीय नेत्यांची नावे घेवून सतत त्रास देत असून येथू दारू पिऊन येवून गोंधळ घालत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच येथील व्यवस्थापक व कर्मचाऱी नेहमीच सहकार्य करत असतात. मात्र येथील कर्मचाऱ्यांसोबतच येथे येणाऱ्या नागरिकांनाही या टवाळ खोरांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे काही महिला व मुलींनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्‍यात
या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सोपान नाना शिंदे हे आजारी आहेत. तरीही नागरिकांच्या जीवरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे सांगत ते दररोज आनंदाने कामावर येवून आपले कर्तव्य बजावत आहेत. जीव रक्षक सोपान नाना शिंदे व धनंजय झिंझुर्डे यांनी या हंगामात अतिशय उत्तम कामगिरी केली असल्याचे येथे दररोज पोहायला येणाऱ्या नागरिकांनी आवर्जून सांगितले. हे दोन्ही जीव रक्षक आपली स्वतःची काळजी न करता काम करतात. मात्र, त्यांना टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून हे प्रकार थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या मदतीने महापालिकेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)