मक्का मशीद निकालानंतर राहूल कॅंडल मार्च काढणार आहेत का? – भाजपा

नवी दिल्ली – हैदराबाद येथील मक्का मशीद बॉंबस्फोट प्रकरणी एनआयए विशेष न्यायलयाने स्वामी असीमानंदांसह सर्व पाच आरोपींना निर्दोष सोडले आहे. या निर्णयाबाबत राजकीय टीकाटिप्पण्या येऊ लागल्या आहेत. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे, तर त्याबाबत कॉंग्रेसने मौन धारण केले आहे.

कॉंग्रेसचे धोरण दुटप्पी असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे. न्यायालय 2 जी चा निकाल जाहीर करते तेव्हा कॉंग्रेस खुषी जाहीर करते. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाबाबत मात्र पुनर्विचार करायला सांगत आहे. आता कॉंग्रेसने जे आरोप केले आहेत, त्याबाबत राहुल गांधी कॅंडल मार्च काढून देशाची माफी मागणार आहेत का?

आज कॉंग्रेसच्या चेहऱ्यावरचा मुखवटा उतरला आहे. ज्या प्रकारे हिंदू धर्माला बदनाम करून कॉंग्रेस तुष्टिकरणाचे राजकारण खेळत होती, ते आता उघडे पडले आहे, असे स्पष्ट करून संबित पात्रा यांनी पुढे सांगितले की पी चिदंबरम आणि सुशील कुमार शिंदे यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. कारण हिंदू दहशतवादाचा सर्वप्रथम उल्लेख पी चिदंबरम यांनीच केला होता. त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी त्याबाबत निवेदन दिले होते.

कॉग्रेसने मात्र या बाबतीत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळ्ले आहे. न्यायालयाच्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही, असे कॉग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)