मक्का मशिद स्फोट : कोण काय म्हणाले ?

एनआयए – आम्ही या प्रकरणाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करून पुढील कार्यवाहीचा निर्णय घेऊ


असदुद्दीन ओवैसी – या प्रकरणात योग्य न्याय झाला नाही. यातील आरोपींना खटला सुरू असताना जामीन मिळूनही त्याच्या विरोधात एनआयएने वरच्या कोर्टात दाद मागितली नाहीं. त्यांची या प्रकरणातील भूमिका आरोपींच्या बाजूने पक्षपातीपणा करणारी होती. एनआय हा सरकारी पोपट आहे. ती यंत्रणा मुकी आणि बहीरी आहे. या निकालामुळे आपली दहशतवादाच्या विरोधातील लढाई कमकुवत झाली आहे.


गुलामनबी आझाद – या निकालामुळे एनआयए वरील लोकांचा विश्‍वास नाहीसा झाला आहे. ही यंत्रणा सरकारचे बाहुले म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


भाजप प्रवक्ते संबित पात्र – न्यायालयाच्या निकालावर आम्ही मतप्रदर्शन करीत नाही. न्यायालये ही पुर्ण स्वायत्त आहेत. त्यामुळे त्यांच्या निकालावर प्रतिक्रीया देणे आम्हाला योग्य वाटत नाही. न्यायालयाने 2 जी प्रकरणात दिलेला निकाल कॉंग्रेसला स्वागतार्ह वाटतो पण या प्रकरणातील निकाल मात्र त्यांना योग्य वाटत नाही हे अयोग्य आहे.


गृहविभागाचे माजी अधिकारी आरव्हीएस मणि – आम्हाला हा निकाल अपेक्षितच होता. आरोपींच्या विरोधात तुकड्यांतील पुरावे एकत्र करून ते जोडण्यात आले होते. या प्रकरणाला हिंदु दहशतवादाचा अँगल नव्हताच. तथापी एनआयएचा वापर करून आरोपींना वाचवण्यात आले आहे असे वाटते ते घातक आहे. यातील जीवितांची हानी कोण भरून काढणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)