मक्का मशिद बॉम्बस्फोट; या प्रकरणात न्याय झालेला नाही-असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली: हैदराबदेतील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाने स्वामी आसीमानंद यांच्यासह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करताच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेस व एमआयएमने या निकालासाठी एनआयएला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तर, बॉम्बस्फोटानंतर ‘भगवा आतंकवाद’ हा शब्दप्रयोग करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर खटला भरण्याची मागणी सुब्रमण्यम् स्वामी यांनी केली आहे.

२००७ साली मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी हैदराबाद येथील एनआयए न्यायालयानं आज पाच जणांची पुराव्याअभावी सुटका केली. न्यायालयाच्या या निकालानंतर एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लगेचच ट्विट केले. ‘२०१४ पासून या प्रकरणातील बहुतेक साक्षीदारांनी आपले आधीचे जबाब फिरवले आहेत. एनआयएने या प्रकरणात एकतर योग्य पद्धतीने बाजू मांडलेली नाही किंवा त्यांच्या राजकीय बोलवित्यांनी त्यांना तसे करू दिलेले नाही. गुन्हेगारी कारवायांमध्ये असा पक्षपात होत राहिला तर न्याय कसा मिळणार, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. ‘या प्रकरणात न्याय झालेला नाही. आरोपींना मिळालेल्या जामिनाला आव्हान देण्याची साधीही तसदीही एनआयए वा मोदी सरकारनं घेतलेली नाही. एनआयएनं केलेली चौकशी पूर्णपणे पक्षपाती होती. यामुळं दहशतवादाविरोधातील लढाई कमकुवत झाली आहे. एनआयए हा एक बहिरा व आंधळा पोपट आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसनंही एनआयए केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनल्याचा आरोप केला आहे. डझनभर साक्षीदारांनी साक्ष फिरवणं हे संशय निर्माण करणारं आहे. या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या निरीक्षणाखाली व्हावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)