मकेची कणसं आणि कांद्याचे नुकसान

निमसाखर परिसरात जोरदार पाऊस

निमसाखर- इंदापूर तालुक्‍यातील निमसाखर, दगडवाडी, शिरसाटवाडी, निरवांगी व खोरोची परिसरात पहाटे चार वाजल्यापासून पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे परिसरातील रब्बी हंगामातील पिकांबरोबच ऊस पिकांच्या एक, दोन पाण्याच्या पाळ्यांची सोय झाली आहे. वाळवणास टाकलेली मकेची कणसे तसेच कांदा पावसात भिजल्याने नुकसानही झाले आहे.
निमसाखर परिसरात आज पहाटे गारवा जाणवत असतानाच ढगाळ वातावरण झाले.पहाटे अचानक पाऊस सुरू झाला. ज्वारी, गहू यासह ऊस पिकांला हा पाऊस फायदेशीर असला तरी बहुतांशी ठिकाणी मका पीक वादळी वाऱ्यात भुईसपाट झाले आहे. याच बरोबर विटभट्ट्यांमधील कच्च्या विटांची पावसाच्या पाण्यात माती झाली. काही ठिकाणी लाभ तर कुठे नुकसान, असे या पावसाचे चित्र आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)