मका हमीभाव खरेदी केंद्रामध्ये ऑनलाइन नाव नोंदणी सुरू

अकलूज- बाजारपेठेत सध्या मकाचे दर पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अकलूज आणि नातेपुते येथे तत्काळ मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू व्हावीत, यासाठी अकलूज बाजार समितीने जिल्हा अधिकारी आणि जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे लेखी आणि दूरध्वनीद्वारे सतत पाठपुरावा केला होता. त्यास अनुसरून मका हमीभाव खरेदी केंद्रवर ऑनलाइन नाव नोंदणीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
तालुक्‍यातील त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या अकलूज आणि नातेपुते कार्यालयाकडे आपल्या मकेची ऑनलाइन नोंद करावी. त्यासाठी 7/12 मका नोंदीचा तलाठ्याचा दाखला, आधार कार्ड आणि बॅंक पास बुकचे झेरॉक्‍स इत्यादीची पूर्तता करावी, असे अवाहन बाजार समितीचे सभापती मोहिते-पाटील यांनी केले आहे.
लवकरच मका खरेदी केंद्र चालू करण्यास परवानगी मिळेल. त्यानंतर खरेदी केंद्र सुरू करणार आहोत. बाजार समितीमध्ये अकलूज आणि नातेपुते येथे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)