मंदोशीतील साकव पुलाचा प्रश्‍न मार्गी

राजगुरूनगर-गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मंदोशी (ता. खेड) येथील दलित वस्तीकडे जाणाऱ्या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा वार्षिक निधीतून या साकव पुलासाठी 30 लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे.
मंदोशी येथील रोकडेवस्तीकडे जाण्यासाठी असलेला जुना पूल मोडकळीस आल्याने या दलित वस्तीकडे जाण्या-येण्यासाठी नागरिकांना मोठी गैरसोय झाली होती. दलितवस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत अनेकदा अधिकारी तालुक्‍यातील नेते यांच्याकडे येथे नवीन पूल बांधण्याची मागणी करीत होते; मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नव्हते. गेली अनेक वर्षांपासून येथील ओढ्यावर पूल करण्यासाठी नागरिकांची मागणी होती. हा पूल व्हावा, यासाठी खेड तालुका भीमशक्ती संघटनेने आंदोलन करीत खेड पंचायत समितीला टाळे ठोकले होते. तरीही याची दखल घेतली जात नव्हती. अधिकारी या प्रश्नाकडे लक्ष देत नव्हते. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य यांनी मंदोशी व रोकडेवस्तीतील नागरिकांना हा पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा पाठपुरावा करून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी पालकमंत्री गिरीश बापट याच्याकडे येथे साकव पूल बांधण्यासाठी निधी देण्याची मागणी व पाठपुरावा केला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या जिल्हा वार्षिक निधीतून या साकव पुलासाठी तीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या साकव पुलाचे भूमिपूजन नुकतेच जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती उपसभापती अमोल पवार, पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर, वाड्याचे सरपंच रघुनाथ लांडगे, सचिन लांडगे, तुकाराम भोकटे, सरपंच सखाराम गोडे, उपसरपंच दादाभाऊ शिके, नामदेव तळपे, एकनाथ तळपे यांच्यासह मोठ्या संख्येने मंदोशीचे ग्रामस्थ उपस्थित होते. येथील दलित वस्तीला जोडणारा पूल मंजूर झाल्याने रोकडे वस्तीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद प्राप्त झाला आहे. गेली अनेक वर्षांची त्याची ह समस्या दूर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)