मंदिरे ही समाजाला वैचारिक मार्ग दाखवणारे अधिष्ठान : संभाजी झेंडे

खळद- मंदिरे ही समाजाला वैचारिक मार्ग दाखवणारे अधिष्ठान असून माणसांना चांगल्या – वाईट मार्गाने जाण्याची प्रेरणा यातून मिळते. तोच मंदिराचा अमूल्य ठेवा जतन करण्याचे काम हे गाव करीत आहे. हे निश्‍चित समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी केले. शिवरी (ता. पुरंदर) येथे न्यू पुरंदर प्रॉपर्टीज ऍण्ड कन्स्ट्रक्‍शन एल. एल. पी. यांच्या माध्यमातून स्वयंभू यमाई देवीच्या मंदिराच्या सुमारे दहा लाख रुपये खर्चाच्या महाद्वाराच्या कामाचे भूमिपूजन झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट मुंबईचे माजी विश्वस्त हरीश सणस हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, न्यू पुरंदर प्रॉपर्टीज ऍण्ड कन्स्ट्रक्‍शन एल. एल. पी. संस्थेचे पदाधिकारी आनंद घोगरे, सुधाकर टिळेकर, अनिल कामथे, रमेश शेळके, नवनाथ कामथे, संतोष गोडांबे, यमाई माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम कामथे, उपाध्यक्ष बबनराव कामथे, खजिनदार नवनाथ कामथे, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार सदस्य शंकरराव कामथे, विश्वस्थ नारायण कामथे, अनंता शिवरकर, सरपंच अनिल निलगंगा कामथे, सतीश लिंभोरे, समीर कामथे, किशोर लिंभोरे,नाना पोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)