पिंपरी – मंदिरात जाणाऱ्या दोन तरूणांना मोटारसायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्याकडील दोन मोबाईल आणि रोकड असा 13 हजार 500 रूपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना रावेत येथे पिंपरी – चिंचवड इंजिनिअरींग कॉलेजजवळ घडली.
स्वामीनारायण भटू पाटील (वय-23, रा. आकुर्डी, प्राधिकरण, मुळ – धुळे) याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील आणि त्याचा मित्र 8 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रावेत येथील इस्कॉन मंदिरात पायी चालले होते. पिंपरी – चिंचवड इंजिनिअरींग कॉलेजच्या अलीकडे उड्डाणपुलाखाली मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. कोयत्याचा धाक दाखवत दोघांना मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील मोबाईल आणि रोकड असा 13 हजार 550 रूपये किंमतीचा ऐवज लुबाडून नेला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0