मंदिरप्रश्‍नी भाजपचा जनतेच्या भावनांशी खेळ- गफ्फार मलिक

अकोले – ‘सौगंध प्रभू रामकी खाते है, मंदिर वही बनायेगे, लेकिन तारीख नही बतायेंगे,’ अशा पद्धतीने आपल्या भावनेशी भाजपा खेळत आहे,’ अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात मलिक बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. वैभवराव पिचड होते. जिल्हाध्यक्ष अख्तर शेख, बाजार समितीचे संचालक दिलावर शेख, प्राचार्य आयाज शेख, तालुकाध्यक्ष अन्सार पटेल, शहराध्यक्ष नाजिम शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, मीनानाथ पांडे, प्राचार्य संपतराव नाईकवाडी, महिलाध्यक्ष आशा पापळ, युवक अध्यक्ष शंभू नेहे, राष्ट्रवादी युवकचे माजी सरचिटणीस राहुल देशमुख, संदीप शेणकर उपस्थित होते.
मलिक पुढे म्हणाले, देशात व राज्यात मुस्लिम समाजाला साथ देणारे एकमेव नेते खा. शरद पवार आहेत. राष्ट्रवादीने अल्पसंख्याकांना सत्तेत उचित स्थान दिले. याउलट भाजप सरकार मुस्लिमांच्या शरियतमध्ये हस्तक्षेप करत आहेत. कुणी काय खावे, यावर बंधने आणत आहेत. मुस्लिमांना चांगले शिक्षण, आरक्षण व संरक्षण गरजेचे आहे. मात्र त्यांच्या मनात मुस्लिमांचा द्वेष आहे.
आ. पिचड म्हणाले, तालुक्‍याचा विकास केला. जनतेची तहान भागविण्यासाठी पाण्याची उपलब्धता केली. त्यात हिंदू, मुस्लिम, शीख, असा दुजाभाव केला नाही. आपण तालुक्‍यातील प्रमुख गावांतील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान विकासासाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. शहरातील इदगाह मैदान भिंत, रस्ते, विजेसह इतरही प्रश्‍न सोडवले. आघाडी सरकारच्या काळात गोरगरिबांना दोन-तीन रुपये दराने धान्य मिळावे म्हणून अन्नसुरक्षा योजना आणली होती. मात्र भाजपा सरकारने या योजनेतून अनेक गोरगरीबांना वगळले. वगळलेल्या कुटुंबांना पुन्हा हा लाभ द्यावा, यासाठी आपण विधानभवनापर्यंत पाठपुरावा केलेला आहे. शहरातील गरजू कुटुबांची यादी तयार करून तसा ठराव नगरपंचायतकडून करून घेऊन तो ठराव तहसीलदारांना देणार आहोत, असेही आ. पिचड म्हणाले.
सूत्रसंचालन कासम मणियार यांनी केले. नगरसेविका शबाना शेख, हैदर पठाण, मैनुद्दीन शेख, जावेद जहागीरदार, अब्दुल इनामदार, हुसेन मन्सुरी, असिफ शेख, अमन तांबोळी, उबेद शेख, मोहसिन पठाण, अरशद तांबोळी यांच्यासह अल्पसंख्याक समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)